Marathi
Surah Al-Masad ( The Palm Fibre ) - Aya count 5
تَبَّتْ يَدَآ أَبِى لَهَبٍۢ وَتَبَّ ﴿١﴾
१. अबु लहबचे दोन्ही हात तुटले आणि तो (स्वतः) नष्ट झाला.
مَآ أَغْنَىٰ عَنْهُ مَالُهُۥ وَمَا كَسَبَ ﴿٢﴾
२. ना तर त्याची संपत्ती त्याच्या कामी आली आणि ना त्याची कमाई.
سَيَصْلَىٰ نَارًۭا ذَاتَ لَهَبٍۢ ﴿٣﴾
३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल.
وَٱمْرَأَتُهُۥ حَمَّالَةَ ٱلْحَطَبِ ﴿٤﴾
४. आणि त्याची पत्नीही (जाईल), जी लाकडे वाहून नेणारी आहे.
فِى جِيدِهَا حَبْلٌۭ مِّن مَّسَدٍۭ ﴿٥﴾
५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल.